E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
धुळे प्रकरणाची होणार एसआयटी चौकशी
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील घटना गंभीर आहे. तेथे सापडलेल्या रोकड प्रकरणाची सत्यता अजून समजलेली नाही. मात्र, त्याची सत्यता बाहेर आली पाहिजे. कारण, विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे हे कदापी सहन करू शकत नाही. विधानमंडळाची आपली एक प्रतिमा आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळ्याच्या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाची अंदाज समिती बुधवारी धुळ्याच्या दौर्यावर होती. या दौर्यादरम्यान खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीत कोट्यवधीची रक्कम आढळून आली. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर काल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. या प्रकरणात कोण दोषी आहे, कोणी पैसे मागितले का? याचा छडा लावण्यात येईल.
याशिवाय, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांना देखील विनंती करून त्यांनी स्वतंत्रपणे समिती नेमून चौकशी करावी. विधानमंडळ समितीची बदनामी होणे परवडणारे नाही. त्यामुळे या प्रकरणात गांभीर्याने कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
धुळे विश्रामगृहातील धक्कादायक घटनेची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अंदाज समिती दौर्यावर असताना विधिमंडळचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. याशिवाय, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे.
अर्जुन खोतकर यांनी फेटाळले आरोप
विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप खोतकर यांनी फेटाळले आहेत. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच सबंध नसल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे. माझा स्वीय सहाय्यक त्या खोलीमध्ये राहत नव्हता, हे सर्व कारस्थान केले गेले असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.
एक कोटी ८४ लाखांची रोकड सापडली
खोली क्रमांक १०२ मध्ये रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर, माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशीची मागणी केली होती. या मागणीस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोली क्रमांक १०२ च्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून खोलीचे कुलूप तोडून तपासणी केली. तेव्हा खोलीत एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड सापडली होती. तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली. यामुळे समितीच्या सदस्य संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.
Related
Articles
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
आर्थिक वर्षाकडे सकारात्मक वाटचाल!
02 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
आर्थिक वर्षाकडे सकारात्मक वाटचाल!
02 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
आर्थिक वर्षाकडे सकारात्मक वाटचाल!
02 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
आर्थिक वर्षाकडे सकारात्मक वाटचाल!
02 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर